हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण

यावल प्रतिनिधी ।  तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रा.पं. सदस्य भूषण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपण आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

पं.स. गटनेता तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार चौधरी यांनी कोरोनाबाबत मार्गदर्शन केले.  कोरोना महामारीची तिसरी लाट ही लहान मुलांवर अत्यंत धोकादायक परिणाम कारक असल्यामुळे लहान मुलांची आपण सर्वांनी काळजी घेणे अत्यावश्यक असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सरपंच महेश राणे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, कैलास कोळी, दिनकर जंगले, अरमान तडवी, भुषण नेहेते, मयुर फालक, मुकेश राणे, धिरज जंगले, अमोल राणे, योगेश जंगले, चेतन बोरनारे, गौरव वायकोळे, फिरोज तडवी, पत्रकार हर्षल आंबेकर, शब्बीर खान, किशोर नेमाडे, ग्रा.पं.सदस्य छबु तडवी, शांताराम तायडे, श्याम महाजन, ग्राम विकास अधिकारी देवानंद सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content