चैतन्य तांडा येथील उघड्या डी.पी.मुळे अपघाताला आमंत्रण; दुरूस्तीची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा येथील डी.पी.चे काम आठ महिन्यांपासून रखडले आहे. शिवाय उघड्या डी.पी.मुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने लक्ष देवून दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील चैतन्य तांडा क्रमांक ४ येथे गेल्या आठ महिन्यांपासून  डी.पी. नादुरूस्त आहे. त्यातच डीपीमध्ये ईलेक्ट्रिक वायन एकमेकांना स्पर्श होत असल्याचे अनेक वेळा अपप्रकार होत आहे. सुदैवाने त्यात कोणालाही इजा पोहचली नाही. ही गंभीर स्वरूपाची माहिती करगाव विकासोचे चेअरमन दिनकर राठोड यांनी कार्यकारी अभियंता हर्षवर्धन जगताप यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. तरी देखील महावितरण कंपनीकडून कोणतीही अंमलबजावणी होत नाही. या कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त होत आहे. 

 

नादुस्त डि.पी.मुळे गावातील कोणालाही जीवितहानी झाली तर याला फक्त एमएसईबी जबाबदार राहतील, असी संतप्त प्रतिक्रिया उमटवली जात आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत नादुरुस्त डिपीत दुरूस्ती करण्यात आली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी दिले आहेत.

Protected Content