संकल्प फाउंडेशनतर्फे सफाई कामगारांना साहीत्य वाटप.

भुसावळ-येथील संकल्प फाउंडेशनतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी लढा देणार्‍या सफाई कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.

संकल्प फाऊंडेशन नेहमीच आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाद्वारे समाजातील गोर-गरीब गरजू लोकांच्या गरजा सोडविण्याचे कार्य करित असते.त्यातच जगभरात व शहरात कोरानाचा वाढत असलेला प्रादूर्भाव पाहता अशा संकटाच्या काळात भुसावळ नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी शहरवासियाच्या आरोग्यासाठी कोरोना योध्दा म्हणुन काम करित आहे. म्हणून त्यांचा सत्कार व त्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने त्यांना लागणार्‍या नित्याच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये घरगुती निर्जंतुकीकरणाचे साहित्य फरशी पुसण्याचे लिक्विड,स्वछतागृह स्वच्छ करण्याचे लिक्विड,हॅन्ड वॉश,हॅन्ड सॅनिटायजर,एन-९५ मास्क आदी वस्तुंचे वाटप आज संकल्प फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य व समाजसेवक संघदिप नरवाडे यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम झाला.

यावेळी युवराज नरवाडे, प्रा.प्रशांत नरवाडे, संघदिप नरवाडे, प्रशांत देवकर, शंकर चौधरी, अनिल चौधरी, अरुण दुधे,गणेश रणसिंगे, विजय मोरे, सोपान वाघोदे, नामदेव राणे, शेख फारुक आदी उपस्थित होते.

Protected Content