पान-मसाला विक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी प्रांतांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । पान-मसाला आणि तत्सम पदार्थ विक्री करणार्‍यांना अद्यापही परवानगी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आलेली आहे. यामुळे आपली दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन आज प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

या संदर्भात पान-मसाला विक्रेत्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भुसावळ शहरात पान विक्रीची पान सेंटर असुन त्यात आम्ही सुटे पानाचा विडा,मसाला पान, फरसाणचे पॅकेट, पाण्याच्या पॅक बाटल्या विक्री करतो.पान देखील कागदपत्रांमध्ये बांधून देतो.ग्राहक व आमचे पुरेसे अंतर अशी आमची बैठक व्यवस्था आहे.तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे. स्वतः तोंडाला मास्क लावून आम्ही आमचा व्यवसाय करणार आहोत. मार्च महिन्यांपासून आमची दुकाने बंद असल्याने उपजीविकेचे साधन असल्याने आमचे कुटुंब पूर्णपणे त्यावर अवलंबून आहे.आज रोजी आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. भुसावळ शहरात कपडे,कटलरी,सलून दुकाने, चपला-बुटांची दुकाने,इलेक्ट्रिक दुकाने, हार्डवेअर दुकाने सुरू झाल्याने आमची दुकाने सुरू करण्यास काहीही अडचण राहिलेली नाही.तरी शहरातील सर्व पान विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.तसेच शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करू व शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास सर्व पान विक्रेते जबाबदार राहणार अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांना २ जुलै रोजी देण्यात आले आहे.

Protected Content