Home Agri Trends शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड करू नये; कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड करू नये; कृषी विभागाचे आवाहन

bt cotton

जळगाव, प्रतिनिधी । एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगामात हे बियाणे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे वापरुन अनेक बोगस कंपन्या बियाणे उत्पादन करुन विकत आहे. एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगामात हे बियाणे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257/2239054 वर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


Protected Content

Play sound