तांबापुरा दंगलप्रकरणातील फरार आरोपी अटकेत; दोघांना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात दंगलीची घटना १८ मार्च रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटात विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील फरार असलेले दोन आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता ८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, तांबापुरा परिसरात दोन गटात दंगलीची घटना १८ मार्च रोजी रात्री घडली होती. यात तलवारीने मारहाण करुन दुखापत करुन फरार झालेल्या सद्दाम अकील खाटीक (वय-३०) रा. तांबापुरा यांच्यासह रहिम गुलाब शहा (वय-४८) रा. तांबापुरा या दोघांना दीड महिन्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना ८ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशी आहे घटना
तांबापुरा दंगलीप्रकरणी युवराज ठाकरे याच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात 14 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 13 जण कारागृहात आहेत. घटना घडली त्यावेळी युवराज ठाकरे व सोनू जाधव हे नाचत असतांना त्यांना सद्दाम खाटीक याचा धक्का लागला होता. यावरुन भांडण होवून सद्दामाने इतरांना सोबत आणत मारहाण केली होती. यावेळी सद्दामाने तलवारीने युवराज व सोनू या दोघावर वार केले होते. त्यात दोघेही जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर सद्दाम तसेच रहिम शहा हे दोघेही फरार झाले होते. एमआयडीसी पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांना सुचना केल्या. लोकरे यांनी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, आनंद सिंग पाटील, अतुल वंजारी, अशोक संगत, गोविंदा पाटील, हेमंत कळस्कर, सुनील पाटील, अशोक पुसे, सचिन पाटील, योगेश बारी या पथकासह दोघांना अटक केली. न्यायमूर्ती अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केले असता न्या.जैन यांनी दोघांना 8 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Protected Content