जेवताना ठसका आल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

balak mrutyu parola

पारोळा प्रतिनिधी । शाळेत जाण्यापूर्वी घरी जेवण करत असताना अचानक ठसका आल्याने नववीचा विद्यार्थी त्यात दगावल्याची घटना शहरात घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, अमोल देवीदास नाईक वय १४ हा एन इ एस हायस्कूलमधील नववीचा विद्यार्थी गुरूवारी सकाळी ट्युशनला जाऊन घरी आला होता. दुपारी १२ वाजेला शाळेत जाण्याअगोदर तो घरी जेवण करीत होता. जेवताना अचानक त्याला ठसका आला त्यात तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला कुटीर रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अमोल याचे वडील देविदास नाईक हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. एक भाऊ सह अमोल व आई वडील हे उंदीरखेडा रोड वरील गोपाळ नगर येथे राहतात. अचानक आलेल्या या घटनेने हे कुटुंब भेदरले आहे.

Protected Content