कलाशिक्षक साळी यांची पेंटिंगद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोनाच्या संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात व्यक्ती व सामाजिक संस्था ह्या गरजुंना मदत करत आहे. याच प्रमाणे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जात आहे. त्याच प्रमाणे कलाशिक्षक राजू साळी यांनी पेंटिंगद्वारे घरी थांबण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात, घर के सामने एक लक्ष्मण रेखा खिच दो, और इस लक्ष्मण रेखा का हर हाल मे पालन करना हैं असे आवाहन केले होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव, येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी पोष्टर कलर माध्यमात कल्पकतेने पैंटींग तयार केली असून सदर पैंटींगमध्ये अत्यावश्यक वस्तूंची रचना करून त्यांना घरातच दाखविण्यात आले आहेत. विशेषतः पेंटिंगचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानाच्या सुचनेच पालन करून लक्ष्मण रेषा मारत असून कोरोना रुपी रावणाला रेषेच्या बाहेरच दाखवण्यात आले आहे. ही पेंटिंग बघितल्यावर जुन्या काळातील भास निर्माण होतो. पेंटिंगवर “कोरोना रुपी रावणाला लक्ष्मण रेषा न ओलांडू देवू ,अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना घरातच राहून सहकार्य करू.’! तरी आता उन्हाळा चालू आहे. चिऊ काऊची पाण्याची सोय पेंटिंगमध्ये दाखवण्यात आली आहे. “पाण्याद्वारे भागवू चिऊ काऊची तहान, घरातच राहून मनी जागवू कोरोनाचे ज्ञान.”! ही घोषवाक्य वापरण्यात आली आहेत. राजू साळी हे बऱ्याच वेळा सामाजिक विषयांवर जागृती करत असतात. त्याच्या सामाजिक कार्याचे सर्वंदूर कौतुक होत आहे. पेंटिंगबाबत माहिती देतांना राजू साळी म्हणाले की, एक चित्र हजार शब्दांचे काम करीत असते व चित्रातून जनसामान्यांपर्यंत लवकर पोहचता येते. तरी सर्वांनी घरातच राहून सहकार्य करावे, शेवटी हे ही दिवस निघून जातील. उद्याचा सूर्य एक प्रकाश घेऊन येल.आणि सर्व अंधकार दूर होईल…. !

Protected Content