शेतकऱ्यांचा शेतीतील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहराच्या जवळ असलेल्या धानवड, चिंचोली, कंडारी या गावांतील शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसापासून शेतीसाठी वीज नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज शहरातील महावितरण कार्यालयामध्ये धाव घेतली. वीज पुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

धानवड, उमाळा, चिंचोली, कंडारी गावाच्या शेती परिसरात पंधरा दिवसापासून वीज पुरवठा बंद आहे. वीज पुरवठा बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय गाठले. कार्यलयात त्यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता एम. बी. चौधरी यांची भेट घेऊन आपली आपबिती सांगितली. आम्ही महावितरण कर्मचारी व अधिकारी यांना सहकार्य करण्यास तयार असून अधिकारी त्यांचा फोन देखील उचलत नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी यावेळी केली. यावेळी शेतकऱ्यांनी जो पर्यंत वीज वितरणाचे व्यवस्थितपणे नियोजन केले जात नाही तोपर्यंत प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे
दालन सोडणार नाही असा पवित्रा घेतला. तर प्रभारी कार्यकारी अभियंता एम. बी. चौधरी यांनी संबधित अधिकाऱ्याला बोलवून घेत शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा व त्यांचा प्रत्येक फोन उचला अशी सक्त ताकीद दिली. दरम्यान, दोन दिवसात वीजपुरवठा वितरणात सुधारणा झाली नाही तर जळगाव शहरासाठी असलेल्या उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. याप्रसंगी शेतकऱ्यांसह युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, दिलीप आप्पा चव्हाण, चिंचोलीचे शरद घुगे, धनवड युवा सेना तालुका सरचिटणीस अविनास पाटील, जनार्धन पाटील, कालिदास पाटील, राकेश घुगे, आबा घुगे, उमाळ्याचे माजी सरपंच अनिल खडसे आदी उपस्थित होते.

भाग १

https://www.facebook.com/508992935887325/videos/166707931641474

भाग २

https://www.facebook.com/508992935887325/videos/417742852851461

भाग ३

https://www.facebook.com/508992935887325/videos/755850361803939

Protected Content