‘मी पणा’ केला म्हणून पक्ष सोडावा लागला : फडकेंचा खडसेंवर हल्लाबोल

रावेर प्रतिनिधी । पक्षात ‘मी पणा’ केला म्हणून पक्ष सोडावा लागला असे नमूद करत डॉ. राजेंद्र फडके यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

भाजपाची विस्तृत स्वरूपाची महत्वाची  बैठक कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये संपन्न झाली. यावेळी  भाजपा विचाराचे सरपंचाच्या गळ्यात रुमाल टाकण्याचे काम काही लोक करताय..पक्षात मी पणा केला म्हणुन पक्ष सोडावा लागला..त्यांच्या पक्ष सोडल्यामुळे भाजपाला काहीही फरक पडला नाही उलट भाजपाचा विस्तार होत असल्याचे म्हणत डॉ राजेंद्र फडके पुन्हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बरसले 

डॉ फडके पुढे म्हणाले बूथ संपर्क अभियान मार्फत केंद्र सरकारच्या कामांची माहिती बूथ प्रमुखांनी जनते पर्यंत पोहचवावी मागील विधानसभा निवडणूकीत रावेरात स्व. हरिभाऊ जानळे तर मुक्ताईनगर मधुन खडसेंचा पराभव जात-पैस्यामुळे नव्हे तर भाजपा सरकारची कामे जनते पर्यंत पोहचली नाही  म्हणून झाला. यातुन सबक घेऊन पुढे केंद्र सरकारची कामे जनते पर्यंत पोहचविण्याचे अवाहन यावेळी डॉ  फडके यांनी केले. यावेळी अजय भोळे, अशोक कांडेलकर यांनी मार्गदर्शन केले  

यांची होती उपस्थिती

दरम्यान या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील,  भाजपाचे जेष्ठ सदस्य सुरेश धनके,जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन कैलास सरोदे, अशोक कांडेलकर, जि. प. सदस्य नंदा पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन अमोल पाटील,  बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र लासुरकर, शिवाजीराव पाटील, माजी सभापती जितेंद्र पाटील, माजी उपसभापती सुनिल पाटील, महेश चौधरी. प स सदस्य कविता कोळी, नगरसेवक यशवंत दलाल, महेश पाटील, गोपाळ नेमाडे प्रल्हाद पाटील, प्रा. सि. एस. पाटील, रेखा बोंडे नितिन पाटील आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content