जळगावात सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने इंद्रप्रस्थ नगरातील राजाराम मंगल कार्यालयात मंगळवारी २ मे रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा जिल्हास्तरावर घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील ११ बटूंची उपस्थिती लाभली.

नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बहुउद्देश्य संस्थाची स्थापना 2020 मध्ये झाले असून समाज हितासाठी अनेक उपक्रम राबवले जाते. यात परशुराम जयंती कोविडमध्ये गरजूंना मदत किराणा वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटपची अशी विविध उपक्रम राबविले जाते. या अनुषंगाने मंगळवारी २ मे रोजी सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा विधी दिगंबर काळे गुरुजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी संजय जोशी, कुणाल अत्रे, आनंद जोशी, विवेक जोशी, दीपक काळे, देवा काळे, ईश्वर पाटील, केतन काळे यांचे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमलाताई पाठक यांनी केले.

Protected Content