शेंदुर्णी येथील पीजे बचाव कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा इशारा

शेंदुर्णी प्रतिनिधी | पाचोरा-जामनेर अर्थात पी. जे. नॅरोगेज रेल्वे भुसावळ विभागाकडून कायम स्वरूपी बंद करण्यात येणार असल्याने पीजे बचाव कृती समितीच्या शेंदुर्णी बैठकीत शनिवार दि. १५ रोजी पी. जे. रेल्वेला ज्या ज्या गावांमध्ये थांबा आहे तेथील रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

 

पीजे बचाव कृती समितीची बैठक गजाननराव गरूड पतसंस्था सभागृह व नगर पंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन बुधवार दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. पीजे रेल्वे बचाव कृती समितीने आक्रमक भूमिका घेत पाचोरा, वरखेडी,पिंपळगाव, शेंदुर्णी, पहूर, भगदारा, जामनेर येथे सभा घेण्यात आली. स्थानिक कृती समितीच्या वतीने परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की शनिवार दि. १५ जानेवारी रोजी पीजे रेल्वस्थानक असलेल्या प्रत्येक गावी धरणे आंदोलन करा. प्रत्येक ठिकाणी पीजे रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासाठी जनजागृती करण्यात येईल व घोषणा देऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी एकत्रित कृति समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, उपाध्यक्ष भरत खंडेलवाल, अविनाश भालेराव खजिनदार पप्पु राजपूत, संजयदादा गरूड, सागरमल जैन, शांताराम गुजर, अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, पंडितराव जोहरे, डॉ. विजयानंद कुलकर्णी, विलास अहिरे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, राहुल धनगर आदी उपस्थित होते.

Protected Content