बिकानेर एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरून सहाजणाचा मृत्यू, ६० जण जखमी

दिल्ली वृत्तसंस्था | बिकानेर एक्सप्रेसचा गुवाहाटीवरुन बिकानेरला जात असतांना बंगालमधील ‘धामोहनी’ या ठिकाणी अपघात झाला असून या अपघातात रेल्वेचे १२ डबे रुळावरुन घसरले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत सहा जनांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत.

गुवाहाटीवरुन बिकानेरला जात असतांना बिकानेर एक्सप्रेसचा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला एक्स्प्रेसचे चार डबे घसल्यानंतर त्यातील काही डबे पूर्ण पलटी होऊन हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याचं काम वेगाने सुरू आहे.

उत्तर-पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी गुनीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या घटनेत ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींना एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्च स्तरीय चौकशी समिती बसवण्यात आली आहे.”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content