१२ मे पासून सुरू होणार मोजक्या रेल्वे गाड्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था । १२ मे पासून निवडक रेल्वे मार्गांवरून मोजक्या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असून याची उद्यापासून बुकींग करता येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. देशातील सद्यस्थीती पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून या संदर्भात लवकर घोषणा होऊ शकते. दरम्यान, लॉकडाऊनबाबत निर्णय स्पष्ट झाला नसतांनाच रेल्वे मंत्रालयाने मोजक्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. १२ मे पासून काही ठराविक मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली. यामध्ये दिल्ली ते मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावी, तिरुअनंतरपुरम, मडगाव, दिब्रुगढ, अगरताला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्‍वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई या स्थानकांना जोडणारी रेल्वेसेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क वापरणं बंधकारक असणार आहे. तसंच सर्व प्रवाशांचं प्रवासापूर्वी थर्म स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे. करोनाचं कोणतंही लक्षण नसलेल्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच सोमवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तिकिटांचं आरक्षण करता येणार आहे.

Protected Content