प.वि.पाटील विद्यालयात महिला दिनानिमित्त बचत गटाच्या महिलांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी. पाटील विद्यालय एम.जे. कॉलेज जळगाव येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील मॅडम यांच्या हस्ते शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिला बचत गटाच्या कर्मचारी , कुसुम पाटील, कमल पाटील, सविता पाटील, नीलिमा पाटील यांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, दहा तासाचा दिवस आणि कामाचे ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी 8 मार्च 1908 साली अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ कम्युनिस्ट कार्यकर्ते क्लारा झेटकिन यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये 8मार्च 1943 पासून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी महिलाना समानतेचे वागणूक मिळावी या साठी झटले पाहिजे. अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले.

Protected Content