Home धर्म-समाज माणुसकी समूहाचे लोहारा येथे हुतात्म्यांना अभिवादन

माणुसकी समूहाचे लोहारा येथे हुतात्म्यांना अभिवादन

0
48


 

पाचोरा, प्रतिनिधी ! तालुक्यातील लोहारा  येथे शहीद दिनानिमित्त सुर्वे वाचनालयात माणुसकी समूहातर्फे हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

सामाजिक कार्यकर्ते  गजानन क्षीरसागर यांनी वीर भगतसिंग यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला.  तरुण वयात त्यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी  आत्मबलिदान दिले. देशसेवा काय असते याचा आदर्श आपण वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याकडून घ्यावा असे आवाहन तरुणांना केले. कवी मंगलदास मोरे यांनी, नमन माझे हुतात्म्यांना ही कविता सादर केली. सुट्टीवर गावी आलेले जवान चंद्रकांत गीते यांनी मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाला माणुसकी समूह जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, रमेश लिंगायत, हिरालाल बाविस्कर, कवी मंगलदास मोरे, सी.आर.पी.एफ. जवान चंद्रकांत गीते, सुभाष गीते, देवेन्द्रनाथ, माणुसकी समूहाचे सदस्य व गावकरी  हजर होते.

 


Protected Content

Play sound