जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील माहेर आलेल्या विवाहितेला अपशब्द बोलण्याच्या कारणावरून पतीसह भावाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शाबीर शहा बहादुर शहा (वय-४०) रा. शिवनी बहुजन नगर, आकोला यांची पत्नी शाईदाबी यांचे जळगाव शहरातील शिवाजी नगरात माहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलासह त्या माहेरी आल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी शाबीर शहा हे १३ जून रोजी शिवाजीनगरात आले होते. १४ जून रोजी दुपारी २ वाजता शाबीर शहा हे सासऱ्याच्या घरासमोर बसलेले असतांना शेजारी राहणारा मनोज संजय जाधव येवून म्हणाला की, तुझ्या पत्नीचे चरित्र बरोब नाही, तीला सासरी घेवून जावू नको असे सांगितले. त्यावर शाबीर त्याला हटकले असता मनोज जाधवने पत्नी शाईदाबी यांना शिवीगाळ करून मारहाण केली तर पती शबीर शहा याला कुकरचे झाकन मारले आणि शालक अलताफ शहा छोटू शहा यावर दगड मारून फेकला. शेजारी राहणारे मंडळी जमा होताच मनोज जाधवने पळ काढला. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. शाबीर शहा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.