शिवसेनेचे दोन आमदार आमच्यासोबत येणार : भुमरेंचा दावा

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ठाकरे आणि शिंदे गटातील कटुता वाढत असतांनाच मंत्री संदीपान भुमरे यांनी अजून दोन आमदार शिंदे यांच्यासोबत येणार असल्याचा दावा केला आहे.

 

रोहयो मंत्री आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील असा दावा केला आहे. पैठण येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण सुरू झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभेतील ५५ पैकी ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून थेट पक्षावरच मालकी हक्क सांगितला आहे. तर अधून-मधून शिवसेनेतील काही सदस्य हे शिंदे गटात जाण्याची चर्चा होत असतांना भुमरे यांनी केलेल्या दाव्याला महत्वा प्राप्त झाले आहे. मध्यंतरी कोकणातील शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. साळवी यांनी याबाबत वक्तव्य करून पूर्णविराम दिला होता. यामुळे भुमरे दोन आमदारांचा दावा करत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content