परमबीर यांचे अटक वॉरंट रद्द

ठाणे प्रतिनिधी | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातला अटक वॉरंट ठाणे कोर्टाने रद्द केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे कोर्टाने अटक वॉरंट बजावले होते. आज हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. न्यायालयाने वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत.  जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा  वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तब्बल २३४ दिवसांनंतर परमबीर सिंग काल मुंबईत दाखल झाले.  त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झाले आहेत. ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

 

 

 

 

Protected Content