शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, अजित पवारांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर

 

नागपूर : वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. शिळ्या गढीला उत आणण्यात काही अर्थ नाही.असे ते म्हणाले .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात आणि अमित शाह यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन बंद खोलीत चर्चा झाल्याचं वारंवार सांगितलंय, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. अजित पवार यांनी नागपूरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध कामांची माहिती घेतली. सूचनाही केल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली

अजित पवार म्हणाले, “शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे त्यांच्यात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली होती. मी काही तिथे नव्हतो, मी ज्योतिषी नाही. राज्यात महाविकासआघाडी सरकार आलं तेव्हापासून सांगितलं जातंय की हे सरकार जाईल. मात्र आमच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा या सरकारला आशीर्वाद आहे. जोपर्यंत हा आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही.”

अजित पवार म्हणाले, “मध्ये बातम्या पण मला अशा वाचायला मिळाल्या. खरंतर यात माझीही चूक आहे. मी माझी चूक नाही असं म्हणणार नाही. माझ्याकडून काही कळण्याआधीच ‘अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं’ अशा बातम्या वाचायला मिळाल्या. वास्तविक मी प्रत्येक विभागाच्या डीपीसीच्या बैठका घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील घेतल्या. सर्वच विभागांमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे जयंत पाटील देखील अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या परीने काम केलं. मी पण माझ्या परीने काम करतो. आजही मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मिहानबद्दल अलिकडे बैठक झाली नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.”

Protected Content