बीडमध्ये शिवसेना युवा प्रमुखावर प्राणघातक हल्ला

बीड (वृत्तसंस्था) येथील शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर आज दुपारी तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

 

शहरातील सारडा नगरी परिसरात आज राहुल फरताळे हे आपल्या घराकडून शहरात येत होते. तेव्हा सावता माळी चौकाच्यापुढे आल्याबरोबर दुचाकीवर आलेल्या दोघांनी फरताळे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्यांच्यावर तलवार आणि कुकरीने हल्ला चढवला. हल्लेखोर हल्ला करत असताना राहुल यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. राहुल यांना आरडाओरड करताना पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,काही वर्षांपूर्वी झालेल्या वादातून खंडू जगताप आणि दादाराव जगताप यांनी हा हल्ला केल्याची अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Protected Content