जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५ परिचारकांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भोंगळ कारभार सध्या चर्चेत आला असून याची वरिष्ठ पातळीवरून गांभिर्याने दखल घेण्यात आली आहे. या अनुषंगाने कोरोनाची साथ असेपर्यंत कंत्राटी पध्दतीत पदे भरण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात कोविड रूग्णालयात कंत्राटी पध्दतीत २५ परिचारकांची (स्टॉफ नर्स) नियुक्ती करण्यात आली आहे. ते तातडीने सेवेत रूजू होणार असून त्यांना कार्यकाळात २० हजार रूपयांचे मासिक मानधन मिळणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.