यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकसह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व आय. क्यू. ए. सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक साक्षरता दिन ऑनलाइन साजरा करण्यात आला.
प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक साक्षरता दिनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रमुख पाहुणे श्रीमती पी. व्ही. अहिरराव ( मुख्याध्यापिका शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, यावल ) यांनी ऑनलाइन कार्यक्रमात जागतिक साक्षरता दिना विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य संजय पाटील यांनी जागतिक साक्षरता दिना विषयी वर्तमान स्थितीतील साक्षरतेबद्दल आपले विचार व्यक्त केले. तसेच साक्षरतेबाबत एकोणीसाव्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या योगदाना बद्दल माहीती दिली.ऑनलाईन कार्यक्रमाला एकूण ३५ विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रमाचे आयोजन डी. एन. मोरे, डॉ. एस. पी. कापड़े व प्रा. एस. आर. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डी. एन. मोरे.सर यांनी केले. तसेच आभार मनोज पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.