माजी खा.डॉ.उल्हास पाटलांनी घेतली अतिरिक्‍त डीआरएम मीना यांची भेट

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा-जामनेर विभागातील एनजी रेल्वेसेवा तसेच ब्रॉडगेजच्या कामाबाबत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी नुकतीच भुसावळ रेल्वे मंडळातील अतिरिक्‍त डीआरएम रुक्मैय्या मीना यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेदरम्यान मीना यांनी या कामाचा डीपीआर पाठविला असून ऑक्टोबर २०२२ पर्यंत काम सुरु करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील उनियारा या सीमालगत भागातील रहिवासी असलेले मात्र सद्यस्थीतीला कर्तव्याववर भुसावळ येथील अपर डीआरएम पदाचा कारभार सांभाळणारे शेतकरी पुत्र रुक्मैय्या मीना यांची नुकतीच गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी भेट घेतली. भेटीप्रसंगी माजी खा.डॉ.पाटील यांनी पाचोरा जामनेर विभागातील एनजी ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत व ब्रॉड गेजचे काम याबाबत चर्चा केली. या कामाचा डीपीआर मुंबईला पाठवण्यात आला असून, ऑक्टोबर २०२२ पर्यंत काम सुरू करण्याचे नियोजन आहे. भुसावळ मंडळातील इतरही अनेक कामे, उड्डाण पूल पूर्ण करण्यासाठी चर्चा झाली.

अपर डीआरएम मीना यांचा परिचय 

यापूर्वी रुक्मैय्या मीना, उत्तर मध्य रेल्वे मुख्यालय प्रयागराज, जनरल मुख्य अभियंता/ऊर्जा म्हणून कार्यरत होते, त्यांना २०१० मध्ये राष्ट्रपती पुरस्कार, २०१५ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार आणि रेल्वेच्या १३ कोटींची बचत केल्याबद्दल राष्ट्रीय पदक मिळाले होते. भुसावळ विभागात प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे.

 

Protected Content