चाळीसगावात राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे शुक्रवारी आयोजन

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे राज्यस्तरीय आंतर महाविदयालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार रोजी नानासाहेब य. ना . चव्हाण महाविद्यालयात करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . चाळीसगाव संचलित नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण
कला , विज्ञान आणि  वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतर महाविदयालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नानासाहेब य. ना . चव्हाण महाविद्यालयात करण्यात आले आहे. हि स्पर्धा  देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले १९४७ की २०१४ , ऑनलाईन शिक्षण हा पर्याय असु शकतो , करोनाने जगायला शिकवले ..,  हे राज्य मुठभरातील चिमुटभरांचे  ? , कुणासाठी जगावे …. कुणासाठी लढावे …  , प्रसार माध्यमे ही प्रचार माध्यमे  बनतील का ? आदी विषयांवर घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रथम ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करणाऱ्या फक्त ५० विद्यार्थ्यांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच करोना पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार स्पर्धेचे नियोजन करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले आहे. प्रवेश हे मर्यादित असून ५ जानेवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. खालील वेबसाईटवर https://forms.gle/qZXMkhrDLmNRMTsN7 फॉर्म भरता येईल…..

Protected Content