विटनेर शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरूणाला विजेचा जोरदार धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याचीधटना आज सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

राकेश हिंमत जाधव (२४, रा. विटनेर, ता. जळगाव) असे मयत झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. राकेश जाधव हा तरूण विटनेर येथे कुटूंबियांसह वास्तव्यास होता. गॅरेज चालवून व सोबत शेती करून कुटूंबियांना उदरनिर्वाहात हातभार लावायचा. शुक्रवारी सकाळी राकेश हा शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करत असताना त्याचा विजेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार ग्रामस्थांना व कुटूंबियांना कळताच त्यांनी त्यास जिल्हा रूग्णालयात वाहनातून हलविले. तपासणीअंती त्यास वैद्यकीय अधिका-यांनी मृत घोषित केले. राकेश याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, वहिणी असा परिवार आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!