शहरात प्रथमच होणार 108 कुंडी महायज्ञाचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शिवराजे फाउंडेशनतर्फे जळगाव शहरात १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञच्या जागेचे भूमिपूजन शनिवार दि. ५ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाहच्या पावन पर्वावर संत महंतांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी देवीदेवतांचा जयघोष करण्यात आला.

 

नेहरू नगर परिसरातील शिवराजे फाउंडेशनद्वारा शहरात प्रथमच १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञ तसेच दरवर्षीप्रमाणे श्रीमद संगीतमय भागवत कथेचे आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन दि. १ ते ७ डिसेंबर दरम्यान मोहाडी रोड येथील बाबा लॉन्स येथे करण्यात आले आहे. या जागेचे तुलसी विवाहाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संत महंतांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

 

मान्यवर भागवताचार्य हभप सोपानदेव महाराज, श्री धाम वृंदावन निवासी भगवान कृष्ण महाराज यांच्या हस्ते कुदळ मारून तसेच पूजाअर्चा करून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वंदना आणि सुभाष चौधरी या दांपत्याच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक जितेंद्र मराठे यांच्यासह कोकिळा सोनगिरे, भरत बेंडाळे, गणेश शिरसाठ, उषा मराठे, शोभा कोळी, मंजुषा वाणी, भिकूबाई शिंदे, जिजाबाई धनगर उपस्थित होते.  याप्रसंगी देवीदेवतांचा जयघोष आणि मंत्रोच्चार करण्यात आले.

 

कार्यक्रमासाठी बबलू राक्षे, मयुरेश सोनार, सचिन कोळी, शिवाजी सोनगिरे, सुनील जगताप, जयेश सोनगिरे, संदीप माळी, अनिल धनगर,   अमोल वाणी, कृष्णा मराठे, निलेश मराठे, हितेश मराठे, तुषार ढेकळे,  ऋषी माळी, निलेश पाटील, वैभव सपकाळे, केशव पाटील, राकेश ठाकूर, पुष्पेश पाटील, शुभम मराठे,  रोहित कोठावदे, सुनील मराठे आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content