काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; जळगावबाबत सस्पेन्स कायम

congress logo

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात ५२ मतदारसंघाचा समावेश असला तरी जिल्ह्यातील जळगावच्या जागेबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

काँग्रेसने सर्वात पहिल्यांदा उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर रात्री दुसरी यादीदेखील जाहीर करण्यात आली असून यात एकूण ५२ मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दक्षीण कराड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तथापि, जळगाव शहर मतदारसंघाबाबत मात्र अद्यापही सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या जागा वाटपानुसार जळगाव शहराची जागा काँग्रेसला मिळू शकते. येथून निवडणूक लढविलेले डॉ. राधेश्याम चौधरी यांनी बर्‍याच दिवसांपासून तयारीस प्रारंभ केला आहे. आपल्याला उमेदवारी मिळणार याबाबत ते आश्‍वस्तदेखील आहेत. तथापि, पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये जळगावचा समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे भुसावळची जागादेखील काँग्रेसला मिळणार का ? याबाबत चर्चा सुरू असून याबाबतही यादीत कोणताही उल्लेख नसल्याची बाब लक्षणीय आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेरमधून माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, काँग्रेसला यासोबत दुसरा कोणतार मतदारसंघ सुटणार ? याबाबत अद्यापदेखील स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आज दुपारी आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून यासोबत राष्ट्रवादीची यादीदेखील येऊ शकते. यानंतरच खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Protected Content