चोपडा येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता रॅली

chopada

 

 

चोपडा प्रतिनिधी | यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळेच्या वतीने शहरात स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आर्किड इंटरनॅशनल स्कूल पासून ते पंचायत समिति चोपडा पर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उदघाटन चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भरत कासोदे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते पंचायत समिति पर्यंत रस्त्यावरील पडलेले प्लास्टिक पिशव्या व कचरा गोळा करत, प्लास्टिक बंदीच्या व स्वच्छते संदर्भात घोषणा देत स्वच्छतेचा महान संदेश दिला. तसेच पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करुण स्वच्छते संदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याचे कार्य देखील केले. याचबरोबर ऑक्सफ़ोर्ड स्कूल नेही रॅलीमध्ये सहभाग नोंदवाला.

समारोप कार्यक्रमात भरत कासोदे, डॉ.भावना भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुण स्वच्छता आपल्या शरीरासोबतच समाजासाठी ही किती महत्वाची आहे ते सांगितले व आपले शहर स्वच्छ शहरला जनआंदोलन करण्याचे आव्हान केले. तसेच ट्रस्टच्या वतीने पंचायत समितिच्या विविध विभागांना मोफत कचरा कुंडयांचे वाटप विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चोपडा गट शिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले, यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटिल, डॉ.तृप्ती पाटिल, शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी आदि उपस्थित होते.

यानंतर रॅली पंचायत समिति ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे जोरदार घोषणा देत शाळेपर्यंत आणण्यात आल्यानंतर विद्यार्थ्याना सुखरूप घरी सोडण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content