शहरात पहिल्या दिवसाच्या जनता कर्फ्यूला जळगावकरांकडून प्रतिसाद, वाहतूक मंदावली (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे जळगाव शहरात आजपासून तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वाहतूक मंदावली आहे. नागरीकांनी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

कोरोनाचे रूग्ण जळगाव शहरात प्रचंड प्रमाणावर वाढत असल्यामुळे विविध संघटनांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी काल ११ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री देखील शहरात शांतता होती. आज सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना वावरण्यास बंदी केली आहे. शहरातील आकाशवाणी चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीच्या व्यक्तीरिक्त इतर वाहतूक तुरळक दिसून आली. बसस्थानक परिसरात देखील बसेसची ये-जा सुरू जरी असली तरी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थी प्रवश्यांची गर्दी नसल्याने शांतता दिसून येत होती. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू असल्यामुळे त्याठिकाणी थोड्याफार प्रमाणावर गर्दी दिसून येत होती तर पोलीसांच्या बंदोबस्तच्या व्यतिरिक्त रस्त्या मोकळा दिसून येत होता. तसेच शास्त्री टॉवर चौकात शहर पोलीसांनी प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू असल्याचे दिसून येत होते. दरम्यान शहरातील मध्यवर्तीच्या ठिकाणी असलेले फुले मार्केटमध्ये भयान सन्नाटा दिसून आला. अंजिठा चौफुलवर देखील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोडून इतर वाहतूक पुर्णपणे बंद दिसून आली. एकंदरीत जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी जळगावकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणीही बाहेर पडून नये असे आहवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी केले आहे. 

 

आकाशवाणी चौक

https://www.facebook.com/508992935887325/videos/457293458729999

 

नवीन बसस्थानक

https://www.facebook.com/508992935887325/videos/124280869634529

 

कोर्ट चौकात

https://www.facebook.com/508992935887325/videos/453832669191869

 

Protected Content