राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले अवघे जळगावकर

bdb0c350 6371 4f24 bc8e 697492bc8c36

जळगाव (प्रतिनिधी) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशासनाच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील खान्देश मॉल – नेहरू चौक – टॉवर चौक – चित्रा चौक – नेरी नाका – पांडे डेअरी चौक मार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टँड समोरून जावून शिवाजी चौक नंतर खान्देश मॉल येथे रॅलीची सांगता झाली.

 

 

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महानगरपालिकचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ. विवेक पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह तहसिलदार वैशाली हिंगे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ. निलाभ रोहण, पोलीस निरीक्षक सर्वश्री गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच रनर्स ग्रुपचे सदस्य, शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकता दौडच्या सुरूवातीस योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. ढाकणे यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.

Protected Content