धरणगाव (प्रतिनिधी) कृभको लि. या सहकारी संस्थेवर रामनाथ चिंधू पाटील यांची विभागीय प्रतिनिधी (आर.जी.बी.मेंबर) म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कृषक भारती को. ऑपरेटीव्ह लि. या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. जळगाव व जालना मतदार संघातून एक सदस्य विभागीय प्रतिनिधी (आर.जी.बी.मेंबर) निवडून द्यावयाचा होता या प्रक्रियेत जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन लि जळगाव चे जेष्ठ संचालक रामनाथ चिंधू पाटील यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून श्री रोहित दिलीप निकम व अनुमोदन प्रल्हादभाऊ जंगले यांनी दिले. तर सुधीर तराळ व विकास निकम यांनी पाठींबा दिला म्हणून कृभको लि. या सहकारी संस्थेवर रामनाथ चिंधू पाटील यांची विभागीय प्रतिनिधी (आर.जी.बी.मेंबर) म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे..
या निवडप्रसंगी रामनाथ पाटील यांचे माजी मंत्री एकनाथरावजी खडसे, जळगाव जिल्हा सह. कॉटन मार्केटिंग फेडशनचे माजी चेअरमन उदेसिंग रामसिंग पवार व सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील आणि जळगाव जिल्हा सह. कॉटन मार्केटिंग फेडशनचे विद्यमान चेअरमन संजय मुरलीधर पवार व व्हा चेअरमन गणेश दामू पाटील यांनी अभिनंदन केले.