व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ पितृ दिवस साजरा करा : हिंदु जनजागृती समितीची मागणी

 

यावल, प्रतिनिधी । राज्यात व देशात व्हॅलेंटाइन डे च्या नावाखाली  होणारे अपप्रचार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा महाविद्यालयात मातृ पितृ दिवस म्हणुन साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे अशी  मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षापासुन आपल्या देशात व राज्यात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणुन साजरा करण्याची पाश्चात्यांची कुप्रथा रुढ् झाली आहे. पाश्चात्यांची व्यवसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद, अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभुमीवर प्रेमाचे बिभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातुन मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाचा  पाश्चात्यांच्या कुप्रथेमुळे होणारे गोंधळ थांबवण्यासाठी १४ फेब्रुवारी या दिवशी पोलीसांची विशेष पथके नियुक्त करून शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणे यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. यासोबत  व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ता होणाऱ्या अपप्रकारांचे प्रमाण पाहता महाविद्यालयातील प्रार्चायांची बैठक घेवुन निर्देश द्यावेत अशा सुचना निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार आणि  पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या या निवेदनावर मखन नाथ, प्रशांत जुवेकर, चेतन भोईटे, मयुर पाटील, जगदीश गायकवाड, कोमल पाटील, नितेश कोळी, सुरज पाटील, रोहीत पाटील, अजय नेवे, कुलदिप राजपुत, मयुर महाजन, धिरज भोळे, विजय भंगाळे, जयेश तेल्ली, ज्ञानेश्वर कुंभार यांच्या स्वाक्षरी आहेत .

 

Protected Content