दिल्लीत पटोले यांना उदयनराजे भेटले

 

 नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आणि  खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थाबाहेर . भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे.

 

नाना पटोले काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली.

 

या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असं सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केलं आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मागील आठवड्यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नियुक्ती झाल्यापासून नाना पटोले यांनी भाजपाविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडण्यास सुरूवात केली असून, काँग्रेसला बळकटी देण्यावर अधिक भर राहणार असल्याचं त्यांनी नियुक्तीनंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळेही या भेटीची चर्चा रंगली आहे.

Protected Content