विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत शालेय स्तरीय क्रीडा स्पर्धा रंगल्या

जळगाव, प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा, वाघ नगर येथे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

 

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण व्हावे यासाठी कोरोना निर्बंधांचे पालन करून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा मोहोत्सवासाठी मीलन अशोक थोरात राज्यस्तरीय खो-खो क्रीडा मार्गदर्शक व २००४ पासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र योगा असोसिएशन पुणे अध्यक्ष डॉ. अनिता सतीश पाटील तसेच मुख्याध्यापक हेमराज पाटील हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाची सुरवात मान्यवरांनी क्रीडा ज्योत पेटवून आणि रस्सीखेच स्पर्धा खेळून करण्यात आली.क्रीडा स्पर्धेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभाग सहभागी झाले होते.

क्रीडा मोहत्सवातील विजयी विद्यार्थी आणि संघ पुढीलप्रमाणे :-
पूर्व प्राथमिक ३० मी.धावणे – प्रथम – गौरव जाधव, द्वितीय – अभय पाटील, तृतीय – वेदांश वारूडकर, पूर्व प्राथमिक बुक बॅलन्सिंग – प्रथम – चिरायू तांदळे, द्वितीय – भार्गवी वाघोदे, तृतीय – प्रार्थना निकुंभ , पूर्व प्राथमिक रिंगणातून बटाटा उचलणे, प्रथम – हर्षिता कुलकर्णी, द्वितीय – उन्नती बोरसे, तृतीय – वसुधा पाटील, प्राथमिक ३० मी. धावणे- मुले – वेदांत सोनार,मनीष पाटील.मुली – क्रिशा सूर्यवंशी, निशिगंधा पाटील. प्राथमिक चक्र साखळी – मुलां मुलींमध्ये गट – जाई, गुलाब,जास्वंद, केवडा,निशिगंध. माध्यमिक ५० मी.धावणे- मुले – लोकेश माळी,सर्वेश महाजन,चिरायू सैदाणे, मुली – चैताली पाटील,आयुषी कुलकर्णी, नेहा सुरळकर. माध्यमिक रस्सीखेच- ५ वी ६ वी गटातून – ६ वी अर्जुन, ७ वी ८ वी गटातून – ७ वी माधव, ९ वी १० वी गटातून – ९ वी सरस्वती.  माध्यमिक खोखो – ५ वी ६ वी गटातून – ६ वी अर्जुन, ७ वी ८ वी गटातून – ८ वी शारदा, ९ वी १० वी गटातून – ९ वी सरस्वती, मुली ,१० वी गंगा मुले. माध्यमिक कबड्डी- ७ वी ८ वी गटातून – ८ वी शारदा, ९ वी १० वी गटातून – १० वी गंगा. माध्यमिक व्हॉलीबॉल- ७ वी ८ वी गटातून – ८ वी शारदा, ९ वी १० वी गटातून – ९ वी सरस्वती,
वरील विद्यार्थी आणि संघ विजयी ठरले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक संतोष वाळसे यांनी केले. मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयक वैशाली पाटील, जयश्री वंडोळे यांचे मार्गदर्शन लाभले. व्हॉलीबॉलसाठी आकाश शिंगाणे, दीपक सपकाळे, कबड्डीसाठी सचिन गायकवाड,खोखोसाठी सुयोग गुरव, शर्यतीसाठी श्रीराम लोखंडे तसेच विविध स्पर्धांसाठी सर्व सहकारी शिक्षकांनी मेहनत घेतली.

Protected Content