जिल्ह्यातून बाहेर जायचे वा बाहेरून यायचे आहे ? : अशी मिळवा परवानगी !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात अडकून पडलेल्या वा बाहेरून जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक असणार्‍यांना पासेसच्या माध्यमातून परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परवानगी नेमकी कशी मिळवावी याची माहिती नसल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. ही अडचण ओळखून लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे आपल्यासाठी बाहेर जाण्यासाठी परवानगी नेमकी कशी मिळवावी याची अगदी स्टेप-बाय-स्टेप तसेच अत्यंत सुलभ पध्दतीत माहिती देण्यात येत आहे.

१ ) जळगाव जिल्हयात अडकलेले स्थलांतरीत कामगार , यात्रेकरु , पर्यटक , विद्यार्थी व इतर व्यक्ती यांनी त्यांचे इच्छित स्थळी जाण्याची परवानगी मिळण्याकरीता त्यांनी https://jalgaon.gov.in या संकेतस्थळावर जाऊन https://jalgaon.gov.in/covid-19 या टॅबवर जाऊन दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती माहिती विहीत नमुन्यात अचूकरीत्या भरावी. ( आपण येथे थेट क्लिक करून हा अर्ज भरू शकतात. )

२) जळगाव जिल्हयातील रहिवासी असलेले परंतु इतर जिल्हयात , राज्यात अडकलेले स्थलांतरीत कामगार , यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांनी त्यांची आवश्यक माहिती [email protected] या ईमेल वर सादर करावी.

३) ज्या नागरीकांना वरील प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे शक्य नाही, त्यांनी ते ज्या ठिकाणी आहेत त्या क्षेत्रातील संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालयात समक्ष जाऊन विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी अशी परवानगी देण्याकामी आपले कार्यालयात स्वतंत्र परवानगी कक्ष स्थापन करावा. ऑफलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती https://jalgaon.gov.in या संकेतस्थळावर अचूकरीत्या भरावी. तसेच अशा प्रकारे प्राप्त झालेल्या अर्जाचे स्वतंत्ररीत्या नोंदवही ठेवावी व दैनंदिन गोषवारा काढून त्याची प्रत दररोज नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना सादर करावी.

४) जळगाव जिल्हयातून बाहेर जाण्याकरीता व जळगांव जिल्हयामध्ये येण्याकरीता अर्ज करणार्‍या प्रत्येक व्यक्ती / नागरीक यांना त्यांच्या अर्जासोबतच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायीक ( नोंदणीकृत डॉक्टर्स ) यांनी अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे इनफ्ल्यूएंझा आजारा सारखी लक्षणे आढळून येत नसल्याबाबत प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तर बाहेरील राज्यातून तसेच जिल्ह्यातून जळगाव जिल्हयात येणार्‍या सर्वच व्यक्ती / नागरीक यांची वैद्यकीय तपासणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार यांची राहील व आवश्यकते प्रमाणे संबंधित व्यक्ती / नागरीक यांना होम क्वॉरंटाईन अथवा इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईन करण्याबाबतची कार्यवाही करावी. ज्यांना होम क्वॉरंटाईन अथवा इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईन करण्यात येईल त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता , १८६० ( ४५ ) चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील

५) जळगाव जिल्हयात अडकलेले स्थलांतरीत कामगार , यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देण्याकरीता उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे , यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. या कामकाजासाठी नोडल अधिकारी यांना सहायक कर्मचारी म्हणून योगेश पाटील, योगेश पाटील, घनश्याम सानप , अव्वल कारकून , आस्थापना शाखा; सुधीर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच

जळगाव जिल्हयातील स्थलांतरीत कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती हे बाहेर जिल्हयात / राज्यात अडकून पडलेले आहेत, अशा नागरीकांना जळगाव जिल्हयात येण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही करण्यासाठी किरण सावंत पाटील, विशेष भूसंपादन अधिकारी, जळगांव यांची
नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. या कामकाजासाठी नोडल अधिकारी यांना सहायक कर्मचारी म्हणून प्रविण भिरुड, अव्वल कारकून; किशोर पवार; पाराजी बोबड सर्व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांची नियुक्ती करण्यात येत आहे. .

६ ) जळगांव जिल्हयात जाहिर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन मधून कोणत्याही नागरीक / मधील व्यक्ती यांना जळगांव जिल्हयातून बाहेर जाण्यास तसेच कोणत्याही नागरीक / व्यक्ती यांना सदरील कंटेन्मेंट झोन मध्ये येण्याची परवानगी असणार नाही

तसेच

इतर राज्यात व जिल्हयात जाहिर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन मधील नागरीक / व्यक्ती यांना जळगाव जिल्हयात प्रवेश असणार नाही

७ ) ज्या नागरीकांनी जळगांव जिल्हयातून बाहेर जिल्हयात अथवा राज्यात जाण्याच्या परवानगीसाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा नागरीकांना ज्या जिल्हयात जायचे आहे त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांची परवानगी मंजूरी या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतरच या कार्यालयामार्फत जळगांव जिल्हयातून जाण्यासाठीचे पासेस निर्गमित करण्यात येतील. संबंधीत पासेस अर्जदारांना त्यांचे ईमेल वर प्राप्त होतील असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क:-

राज्य नियंत्रण कक्ष: 022 – 22027990 / 22023039

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, कंट्रोल रूम: 0257 – 2217193

 

Protected Content