Home Cities जळगाव मू.जे.महाविद्यालयात “तबला” कार्यशाळा संपन्न

मू.जे.महाविद्यालयात “तबला” कार्यशाळा संपन्न

0
44


जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  मूळजी जेठा महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्र स्वरदा संगीत विभाग आयोजित “तबला वादनातील बारकावे व तंत्र ” या  दोन दिवशीय कार्यशाळेला  विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

 

दि.२३ व २४ जुलै  या  दोन दिवस घेण्यात आलेल्या कार्यशाळेत  जळगाव जिल्ह्यासह बडोदा,मुंबई येथील विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला .या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पं.जयंत नाईक,(तलयोगी पं.सुरेशदादा तळवलकर याचे ज्येष्ठ शिष्य ) यांनी मार्गदर्शन केले. सोबत .आदित्य कुलकर्णी आणि व्यंकटेश तांबे यांनी साथ केली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ संगीत विभाग प्रमुख पं. संजय पत्की  ,तसेच के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित केंद्राचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यावेळी उपस्थित होते.  कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी मू.जे.महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे, प्रा. देवेंद्र गुरव,आणि प्रा. मिलन भामरे यांनी कामकाज पहिले.  सूत्रसंचालन व आभार प्रा. ईशा वडोदकर यांनी मानले.


Protected Content

Play sound