विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी उद्यापासून संपावर

 जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सोमवारपासून विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला आहे. यानुसार उद्या महावितरणसह बीएसएनएल व अन्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.

 

खाजगीकरण, कंत्राटीकरणाविरुद्ध तसेच अन्य न्याय्य मागण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यानी संप पुकारला आहे. यात सरकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्याच्या विविध संघटनांनी २८ आणि २९ मार्च असे दोन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात बीएसएनएलईयु व एनएफटीई या संघटनानी केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण धोरणविरोधात संप पुकारला आहे. तसेच महावितरण कर्मचारी संघटनांनी देखील सहकारी उद्योगांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात २८ मार्च पासून संप पुकारला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बँक कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत.

Protected Content