‘सरपंच चषक’ क्रिकेट स्पर्धेत ‘जय श्रीराम संघ’ विजयी

स्पर्धेत ‘शिवशक्ती संघ’ ठरला उपविजेता

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वढोदे येथे सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्रच्या तालुका संघटनाव्दारे आयोजित ‘खुल्या सरपंच चषक’ स्पर्धा संपन्न झाली. मर्यादीत षट्कांच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात यावल येथील ‘जय श्रीराम क्रिकेट संघ’ विजेता तर ‘शिवशक्ती संघ’ उपविजेता ठरला आहे.

त्यांना मावळते जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते स्मृती चषक व २५ हजार पाचशे पंच्चावन रूपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे स्मृतीचषक ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक साकळी येथील उद्योजक युनुस पिंजारी यांच्या हस्ते देण्यात आले. तर तिसऱ्या क्रमांकाचे स्मृतीचषक व ५ हजार ५५५ रूपये कॉट्रॅक्टर गजानन सोनार यांच्याहस्ते देण्यात आले.

वढोदे गावा जवळच्या शेतातील भव्य अशा मैदानावर संपन्न झालेल्या या सरपंच चषक स्पर्धचा अंतिम सामना .शिवशक्ती सीसी क्रिकेट संघ, रणगाव’ विरूद्ध ‘जय श्रीराम क्रिकेट संघ, यावल’ यांच्यात पार पडला. प्रथम फलंदाजी करत रणगाव संघाने ७९ धावा करून जय श्रीराम संघाला ८० धावांचे लक्ष दिले. हे लक्ष जय श्रीराम संघाने चार ओव्हर्स मध्येच पूर्ण करून विजय मिळवला.

यावेळी यावलचे तहसीलदार महेश पवार,, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,, मावळते जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, मावळते पं.स.सदस्य शेखर  पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, माजी नगरसेवक दीपक बेर्डे, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, उद्योजक युनूस पिंजारी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, शिवसेनेचे पप्पू जोशी, अनिल जंजाळे, गोविंद पाटील, मनवेल उपसरपंच महेंद्र पाटील, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, चेतन सोनवणे, कैलास सपकाळे, पत्रकार यांच्यासह वढोदा व परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.

एक महीन्यांपासून सुरू असलेल्या या स्पर्धत विविध ठिकाणच्या एकूण ६५ संघांनी भाग घेतला. स्पर्धचे आयोजक सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, कैलास सपकाळे, जितेंद्र कोळी, निलेश सोनवणे गणेश बाविस्कर, रवींद्र सपकाळे, अक्षय सोनवणे, रवींद्र कोळी व सर्व वढोदा ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!