अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेचे प्रकाशन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे १९ व्या वर्धापन दिनानिमित्त पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन ७ व ८ मे रोजी कांताई सभागृहात येथे आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या  पत्रिका प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला.

 

लेखक शरदचंद्र छापेकर, अँड.विलास मोरे, संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र रायसिंग सर, शशिकांत वडोदकर सर, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांच्या हस्ते पत्रीकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष साहेबराव पाटील, विनोद निळे, आणि मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे शहराध्यक्ष साहेबराव पाटील यांनी केले. यावेळी प्रकाशन सोहळा निमित्ताने कवीसंमेलन देखील घेण्यात आले. या कविसंमेलनात भीमराव सोनवणे, शशिकांत हिंगोणेकर,, प्रकाश पाटील, विजय लुल्हे, राजेश सुरवाडे, संध्या महाजन, जयश्री काळवीट,संध्या भोळे, शिवाजी अहिरराव, अंजली पाटील, अँड. सुकन्या महाले यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन अँड. सुकन्या महाले यांनी तर आभार प्रवीण लोहार यांनी मानले.

Protected Content