‘एप्रिल फुल’ नाही तर पुढच्या महिन्यापासून ‘नियम फुल्ल’

एप्रिल महिन्यापासून बदलतील काही नियम - सर्वसामान्यांवर होईल परिणाम

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । पुढील महिन्याच्या सुरुवातीला ‘एप्रिल फुल’ करण्याची प्रथा आहे. मात्र २०२२ मधील ‘एप्रिल’ हा महीना जीएसटी, एफडी, टॅक्स यासह बँकिंग क्षेत्रात बदलते नियम घेऊन येत आहे. त्याची अंमलबजावणी करतांना सर्वसामान्यांवर महागाईचा थेट परिणाम होतांना दिसून येणार आहे.

वस्तू आणि सेवा कर नियम

वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस (ई-इनव्हॉइस) जारी करण्याची उलाढाल मर्यादा ५० कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून २० कोटी रुपये केली आहे.

गॅस सिलिंडरच्या वाढू शकतात किमती

सध्या पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत, अशा परिस्थितीत एप्रिलमध्ये पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

औषधांच्या वाढणार किमती

पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी १० टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली असून ड्रग प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत १०.०७ टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे.  त्यामुळे आता 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहे.

म्युच्युअल फंड बदललेला नियम

१ एप्रिलपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे करता येणार नाहीत तर फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागणार आहे.

पीएफ बदललेला नियम

केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायद्यानुसार विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊन त्यावर कर देखील आकारला जाईल. नव्या नियमांनुसार ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात असून त्यावर योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारला जाणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक ५ लाख रुपये आहे.

पोस्ट ऑफिस स्मॉल गुंतवणूक नियम

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जाणार आहे. त्यामुळे बचत खाते वापरणे अनिवार्य असणार आहे.

अॅक्सिस बँक बदललेला नियम

अॅक्सिस बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा १० हजारांवरून १२ हजार रुपये केली आहे. मोफत रोख व्यवहारांची विहित मर्यादा देखील बदलून चार विनामूल्य व्यवहार किंवा १.५ लाख रुपये केली आहे. तर पंजाब नॅशनल बँक पीपीएस लागू करत असून ४ एप्रिलपासून १० लाख आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य आहे.

क्रिप्टोकरन्सी नियम बदल

सर्व व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी kripto विकून नफा झाला असल्यास ३० टक्के कर आकारला जाणार आहे.

गृहकर्जावर १.५० लाख आयकर लाभ बंद

२०१९-२० च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ४५ लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱ्यांना गृहकर्जावर अतिरिक्त १.५० लाख रुपये आयकर लाभ देण्याची घोषणा केली होती. आता कलम ‘80 EEA’ अंतर्गत या कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एफडी होणार बंद

कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू झाली होती. एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना वाढवण्याची घोषणा केलेली नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष योजना ते दोन वर्षांसाठी बंद करू शकतात.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!