विलगीकरण कक्षात इतरांची वर्दळ; चोपडा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये समस्या

चोपडा प्रतिनिधी । येथील कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात इतर नागरिकांचा वावर होत असून येथील रूग्णांना मिळणार्‍या सुविधांमध्ये त्रुटी असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता होत आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावने हाहाकार उडाला आहे. त्याचे लोण चोपडा शहरापर्यंत पोहचल्याने कोरोना रुग्णांसाठी प्रशासकीय इमारतीत अडीचशे खाटांचे कोरोना केअर सेंटर बनविण्यात आले आहे. त्यात तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांसाठी विलगीकरण कक्ष बनविण्यात आला आहे. मात्र याठिकाणी असणार्‍यांना तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. याठिकाणी संशयित रुग्ण एकाच जागी वावरतात. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ठेवले चारही माठ एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. त्यात नगरपालिकेचे टँकर पाणी टाकून गेले की दुतर्‍या दिवशी तेथे येते. पॉजिटीव्ह रुग्ण तेथूनच पाणी पितात. सर्व एका माठात पाणी संपले की , दुसर्‍या मठात ते पाणी पीत असल्याने कोरोना विष्णूचा फैलाव बनण्याचे जणू ते केंद्र असावे असे वाटते. दरम्यान शौचालयांची संख्या तीनच असल्याने त्यांचा वापरही रुग्ण व संशयित करीत असल्याने. तेथील संशयित रुग्ण अतिशय उद्विग्न होऊन सहन करीत आहेत. यावरून सदर कोविना केअर सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी अलगिकरण कक्ष नसून तो सलगीकरण कक्ष असल्याचे संशयित रुग्ण सांगतात मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी सकस आहाराची आवश्यकता आहे. मात्र येथील जेवण अतिशय निकृष्ट प्रतीचे असल्याच्या आरोप येथील रूग्णांनी केला आहे. तसेच जेवण देतांना एका गोणीत पॅकिंग करून आणले जाते. येथे असणार्‍यांना जेवण दुरून फेकून दिले जाते. हा सर्व प्रकार संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी होत आहे.

Protected Content