जादा दराने विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई ; प्रमोद पाटील चिलोणकर

कासोदा ता. एरंडोल, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉक डाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वास्तूचे दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. मात्र, काही दुकानदार हे जादा दराने वस्तू विकत असल्याची तक्रारी येत असल्याने अशा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे राष्ट्रीय मानवधिकार सामाजिक व न्याय संगठनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

शासनाने लॉक डाऊन काळात जनेतेच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तुंची विक्रीसाठी अर्थात किराणा दुध, औषधे इतर काही दुकाने सुरु करण्यासाठी काही वेळासाठी सूट दिली आहे. सध्या रोजगार बंद असल्याने मजूरी करणाऱ्या नागरिकांची बिकट अवस्था झाली आहे. तरी किराणा माल दुकानदार, औषधी विक्रेते किंवा इतर वस्तुंची विक्रेते ज्यादा भावाने माल विक्री करीत असल्याच्या तक्रारी होत आहे. तरी सर्व विक्रेत्यांनी जास्त भावाने कोणत्याही वस्तुची विक्री करू नये. ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी दिला आहे.

Protected Content