राज्यात २५ हजार कंपन्यांमध्ये उत्पादन सुरु, सहा लाख कामगार करताय काम : उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रेड झोन वगळता सध्या ५७,७४५ उद्योगांना परवाने देण्यात आले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

 

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये आज उद्योगमंत्री सुभाष देसाई माहिती देतांना सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी ५७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

Protected Content