भुसावळ (प्रतिनिधी) आषाढ़ी एकादशी निमित्त वारकरी आणि भाविकांसाठी पंढरपुरकरीता नागपुर-मिरज आणि नागपूर-पंढरपुर या विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन मध्य रेल्वेने केले आहे.
१) नागपुर-पंढरपुर विशेष गाड़ी क्रमांक ०१२०६ ही विशेष गाड़ी दिनांक १०/०७/२०१९ रोजी नागपुर स्थानकावरून सकाळी ७.५० वाजेला पंढरपुरसाठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ४.१० ला पंढरपुरला पोहचेल.गाड़ी क्रमांक ०१२०५ ही विशेष गाड़ी दिनांक १३/०७/२०१९ रोजी पंढरपुर स्थानकावरून सकाळी ५.३० वाजेला नागपुरसाठी सुटेल. ही गाड़ी रात्री ११.३० ला नागपुर स्टेशनला पोहचेल.ही गाडी अजनी, वर्धा, पुलगांव, धामनगाँव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबेल.या गाडीला १२ स्लीपर कोच, दोन वाताकूलित थ्री टियर कोच, दोन जनरल कोच असतील.
२) नागपुर-मिरज विशेष गाड़ी क्रमांक ०१२६३ ही विशेष गाड़ी दिनांक ०९/०७/२०१९ रोजी नागपुर स्थानकावरून सकाळी ७.५० वाजेला मिरजसाठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१५ ला मिरजला पोहचेल.गाड़ी क्रमांक ०१२६४ ही विशेष गाड़ी दिनांक १४/०७/२०१९ रोजी मिरज स्थानकावरून पहाटे २.१५ वाजेला नागपुरसाठी सुटेल. ही गाड़ी रात्री ११.३० ला नागपुरला पोहचेल.ही गाडी अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी, पंढरपुर, सांगोला, म्हसोबा, डोंगरगाव, जाटरोड, कवठे महांकाळ, सलाग्रे, अरग या स्थानकावर थांबेल.या गाडीला १२ स्लीपर कोच, दोन वाताकूलित थ्री टियर कोच, दोन जनरल कोच असतील.
या सर्व गाड्यांचे आरक्षण बुकिंग दिनांक ३०.०६.१९ पासून आरक्षण केंद्रावर सुरु होईल.