Home धर्म-समाज वरणगावात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

वरणगावात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा महिला दक्षता समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश मलिक या होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार ८ मार्च रोजी सकाळी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पोलीस सभागृहामध्ये महिला दक्षता समितीच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर ,आशा वर्कर, वकील, न्यायाधीश व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महिला दक्षता समितीच्या सविता माळी यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशिका ज्योती गुरव यांनी केले.


Protected Content

Play sound