Home Cities जळगाव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या जळगावात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या जळगावात

0
101


जळगाव प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस हे उद्या दिनांक ८ जुलै रोजी जळगावच्या दौर्‍यावर येत आहेत.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस हे जळगाव येथे येत असून याबाबतचा अधिकृत दौरा जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केला आहे. यानुसार ते मालेगाव येथून जळगाव येथे येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे ८ जुलै रोजी सायंकाळी जळगावात येणार आहेत. ते येथेच मुक्काम करणार आहेत. यानंतर ९ जुलै रोजी फडणवीस हे सकाळी ९.३० वाजता कोविड सेंटरला भेट देणार असून नंतर ते जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ते औरंगाबाद येथे जाणार असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने नवीन दौर्‍यात नमूद केले आहे.

दरम्यान, ते भालोद येथे भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार/आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती सुध्दा सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound