जळगावात वेगवेगळ्या गुन्ह्यात तीन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काशिनाथ लॉज परीसरात बेकायदेशीर देशी व गावठी दारूची विक्री करणारा, लॉकडाऊन उल्लंघन करणाऱ्या दोन असे एकुण तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील सागर हॉटेलच्या आडोश्याला संशयित आरोपी सागर नारायण सोनवणे (वय-२५) ही देशी दारू विक्री करतांना आढळून आला. आणि तिसऱ्या गुन्ह्यात शहरातील काशिनाथ लॉज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवर संशयित आरोपी इसाक नाजीर खाटीक (वय-४०) रा. जळगाव किराणा समोर, शेरा चौक आणि आबा भिकन सावळे (वय-४०) रा.पटेल हॉस्पीटलच्या मागे, रामेश्वर कॉलनी हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता लोटगाडीवर भाजीपाला विक्री करतांना आढळून आले.

यांनी केली कारवाई
प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना.इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, पो.कॉ. नरेंद्र सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.

Protected Content