Home क्राईम दोन गटात तुफान दगडफेक; दोन जण किरकोळ जखमी

दोन गटात तुफान दगडफेक; दोन जण किरकोळ जखमी

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरात पैशांच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तांबापूरा भागातील महादेव मंदीर परिसरात रविवारी ५ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास  पैशांच्या कारणावरून दोन जणांवर मध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन्ही जणांनी आपल्या गटातील तरूणांना बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही गटातील तरूणांकडून तुफान दगडफेक व काचाच्या बाटल्या फोडण्यात आल्यात. यामध्ये दोनजण किरकोळ जखमी झाले आहे. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोन्ही गटातील संशयित आरोपींना धरपकड सुरू होती. रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound