यावलच्या सिद्धार्थ नगर मधील स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील एका स्वस्त धान्य दुकानदारांकडून कमी धान्य देऊन नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करून येथील रहिवाशांनी आज तहसीलदारांची भेट घेऊन संबंधीत दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

येथील शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील एका स्वस्त धान्य दुकानदारांकडून कमी धान्य देऊन नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या असंख्य तक्रारी यावलच्या तहसिलदार पासून तर पुरवठा विभागाकडे करण्यात आलेल्या आहेत. तरीी देखील या स्वस्त धान्य दुकानावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या धान्य लाभार्थ्यांनी आज तहसीलदार जितेन्द्र कुवर ही भेट घेतली.

त्यांना दिलेल्या तक्रार निवेदनात स्वस्त धान्य मिळवणार्‍या लाभार्थ्यांनी म्हटले आहे की, यावल शहरातील सिद्धार्थनगर परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२४ मधून मागील तीन महिन्यापासून कोरोना संचारबंदी च्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून दिले जाणारे मोफत योग्य प्रकारे धान्य मिळत नाही. किंवा अनेकांना अत्यंत कमी दिले जाते. तसेच सदर स्वस्त धान्य दुकानदारांकडून नेहमीच नेहमीच शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे धान्य देत नाही. या धान्य दुकाना बद्दल या आदी देखील अनेक नागरिकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी असून या विषयाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्या कारणाने आज आज यावल च्या तहसील कार्यालयात अनेक संतप्त महिला व नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. संबंधीत स्वस्त धान्य दुकानदारावर योग्य ती कारवाई करून आमची नावे या स्वस्त धान्य दुकानातून कमी करून इतर ठिकाणी समाविष्ट करावी अशी मागणी केली त्यांनी केली आहे.

दरम्यान हा धान्य दुकानदार हा नागरिकांना कमी धान्य देत असतो. याबाबत आम्हाला धान्य कमी का देतात असे जाब विचारल्यास सदरच्या दुकानदारा कडून धान्य घेणार्‍या नागरिकांना तुम्हाला हे धान्य घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर तुम्हाला जिथं जायचे आहे तिथे जा माझ कोणीही काही करू शकत नाही अशा भाषेत धमकावत असतो. अशी तक्रार वंदना अशोक बोराडे, लिलाबाई अशोक पारधे, छाया प्रकाश गजरे, रेखा बाळू डांबरे, सुलभा प्रल्हाद सपकाळे, लतिफा इक्बाल खाटीक, उषा मधुकर तायडे, मरियम सलीम पठाण, वंदना विष्णू तायडे, आशाबाई गजरे, गंगुबाई अशोक गजरे, रजीयाबी शेख सिकंदर, मोहम्मद शेख हनीफ, नदीम करीम खान, गंगाबाई सुरेश बारी, माया मुकुंदा तायडे, रजीयाबी अफजलखान यांनी केली आहे. या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

Protected Content